

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- आज दिनांक 15 जून 2026 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद नगरपरिषद उर्दू सेमी इंग्लिश शाळा क्रमांक आठ विटा च्या आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेऊन दाखल पात्र मुलांना व इतर सर्व मुलांना पाठ्यपुस्तके गणवेश व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमास विटा नगरपरिषद विटा चे नगरसेवक माननीय श्री. संजय भिंगारदेवे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय रहिमानभाई शिकलगार सदस्य श्री आरिफ कोकणे श्री लाडलेमशाक सुतार श्री अमोल सावंत तसेच महिला सदस्या उपस्थित होत्या.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री बागशिराज सर यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांची स्वागत पाठ्यपुस्तके गणवेश व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तसेच इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्याकरिता शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.