
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा क्र.1 या शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विटा नगरपालिकेच्या मराठी शाळा 100% डिजिटल करून खाजगी शाळांना लाजवेल असं मॉडेल शाळा करण्याचे आश्वासन शिक्षण सभापती सभापती डॉ.लीला भिंगारदेवे यांनी दिले. शाळा मॉडेल करत असताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या दर्जा सुधारण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा. म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे मत शिक्षण सभापती डॉ.लीला भिंगारदेवे यांनी व्यक्त केले.
देणगीदार विनोद दिवटे उपस्थित होते यावेळी शालेय उपयोगी दप्तर, वह्या पुस्तके तसेच गणवेश याचे सुद्धा वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भारत आवटी सर, स्मिता करपे मॅडम,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास जाधव,तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.