दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर हे सोमवार (दि. 15) रोजी भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 10.30 वाजता गारगोटी येथील निवासस्थानातून ते नाधवडेकडे रवाना होतील. सकाळी 10.45 वाजता विद्यामंदिर, नाधवडे येथे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त आयोजित शाळा प्रवेशोत्सव तसेच प्रेरणादायी शाळा भेट कार्यक्रमात सहभागी होतील. यानंतर ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान-2026’ अंतर्गत आयोजित शपथविधी कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, रात्री 8.45 वाजता ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे पोहोचतील. त्यानंतर महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान करणार असून मंगळवारी सकाळी मुंबई येथे आगमन होणार आहे.