दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- खानापूर विधानसभा मतदारसंघ यादीची विशेष सखोल पुन:निरीक्षण मोहीम ३० जून ते २९ जुलै अ या काळात राबविण्यात येणार आहे ,तरी सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दर्पण न्यूज खानापूर विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना ही माहिती दिली.व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे ही आव्हान केले, खानापूर तहसीलदार योगेश्वर टोंपे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार खानापूर मतदार संघाच्या मतदार यादीची विशेष सखोल पुनरीक्षण होणार आहे. या मोहिमेदरम्यान ३५६ मतदान केद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. बी एल ओ मतदारांच्या पडताळणीसाठी ३ वेळा घर भेट देणार आहेत. ज्यांनी गणना प्रपत्र भरले असेल त्यांचीच नावे प्रभाव मतदार यादीत समाविष्ट केली जातील खानापूर मतदार संघात सध्या एकूण ३ लाख ५७ हजार १६५मतदार असून त्यापैकी ३ लाख २६ हजार १३९ मतदारांचे मॅपिंगचे काम ९१.३१ टक्के पूर्ण करून हा मतदार संघ सांगली जिल्ह्यात अव्वलस्थानी आहे,अशीही माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दैनिक प्रीतीसंगमचे प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना दिली,२०ते २९ जून दरम्यान बीएलओ प्रशिक्षण ३० जून ते २९ जुलै दरम्यान घरी जाऊन माहिती संकलन,५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत ७ ऑक्टोंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दैनिक प्रीतीसंगशी बोलताना सांगितले.
जन्मस्थळ सिद्ध करणारी कागदपत्रे आवश्यक, दिनांक १ जुलै १९८७ते २ डिसेंबर २००४ दरम्यान जन्मलेल्यांना स्वतःचा जन्म दाखला आणि आई किंवा वडिलांपैकी एकाचे जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करणारी कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.२ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्यांनी जन्म दाखला तसेच आई-वडील दोघांचेही जन्मतारीख व जन्मस्थळ दाखला देणे आवश्यक असल्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी पत्रकार शिराज शिकलगार यांना माहिती दिली.