
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या उपजी विकेचा आधार असलेल्या टेम्पो चोरून पसार झालेल्या चोरट्याच्या मुस्क्या आवळण्यात चिंचणी वांगी पोलिसांना यश आले.
सविस्तर मिळालेली माहिती अशी की. गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेष आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर पोलिसांनी चोरीस गेलेला १लाख ९० हजार रुपयांचा टेम्पो हस्तगत करत आरोपीला अटक केले, आंबेगाव तालुका कडेगाव येथील शेतकरी नवनाथ अंकुश साळुंखे यांचा टेम्पो दिनांक १ जूनच्या सायंकाळपासून २ जूनच्या पहाटेपर्यंतच्या कालावधीत कोणी अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली तपास दरम्यान पोलीस हवालदार विनायक सावळगे यांना मिळालेल्या माहितीनुसार मोहसीन जैनुद्दीन शेख ( मुळ राहणार भाळवणी, तालुका खानापूर. सध्या राहणार विटा.) याने सदर टेम्पो चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी चोरीचा टेम्पो विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच चिंचणी मांगे पोलिसांनी कडेपूर सांगली मार्गावर सापळा रचला. नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपीसह टेम्पो या आरोपीकडून ताब्यात घेतला. तांत्रिक तपास आणि बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली. त्यामुळे चोरीस गेलेला टेम्पो मूळ मालकाला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांच्या दक्षतेमुळे आणखीन एका गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे गोपनीय माहिती ठरली निर्णायक, चिंचणी वांगी पोलिसांनी वेगाने तपास करून सदर हा गुन्हा उघडकीस आणला.