दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
येरमाळा पोलीस ठाणे आरोपी नामे- दशरथ शंकर जगदाळे, वय 52 वर्षे, रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.13.06.2026 रोजी 12.00 वा. सु. बिड ते धाराशिव जाणारे एनएच 52 रोडवरील तेरखेडा येथील हॉटेल स्वाद चे समोर अशोक लिलँड कंपनीचे मालवाहतुक वाहन क्र एमएच 25 एजे 6586 मध्ये 2 जर्शी गायी व 04 लहान वासरे वाहनासह एकुण 2,32,000₹ मध्ये गोवंशीय जातीच्या दोन जर्शी गायी व 4 वासरे क्रुरपणे भरुन त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 3,11(1)(बी) (एफ) (एच)(के) सह मपोका कलम 119 सह मोवाका कलम 83/177 सह महा. प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5(अ), (1), (2) (5)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.