दर धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने ) :- दि.१० जुनं २०२६ कळंब तालुक्यातील मौजे शेलगाव दिवानी गावाचा मुख्य दळणवळण रोडची खड्ड्याने बिकट परिस्थिती झाली असून नागरिक वाहनधारक आपला जीव मुठीत धरून वाहन चालविण्याची कसरत करावी लागत असल्याने गेल्या दहा वर्षापासून रस्त्याचे काम प्रलंबित असून ग्रामस्थांची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
पावसाळा सुरू होताच रोडची खड्ड्याने झालेली चाळण व खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहनधारकास खड्ड्यातून गाडी चालवण्याची कसरत करावी लागत आहे तर अशा रोड परिस्थितीमुळे अपघात होण्यास नाकारता येत नाही स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक निवडणुकीत विविध राजकीय पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधी गावचा विकास व गावचा रोड डांबरीकरण करण्याचे आश्वासन देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतात मात्र निवडणूक संपल्यावर या गोड बंगाल आश्वासनाचा फिशर पाडतात अशा नागरिकांनी भावना व्यक्त केले आहे या खड्ड्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी मजूर आणि पदयात्री नागरिकास मोठे अडचण निर्माण झाल्याने व आम्हाला या खड्ड्याच्या रोडवरून वाहन चालवण्यात आला सामना करावा लागतो तर या रोडवरील खड्ड्यामुळे वाहनधारक अपघात झाल्याचे सांगतात शेलगावच्या नागरिकांनी शासन प्रशासन तर गावचे मुख्य मंत्रालय ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांना कळवून देखील लक्ष न दिल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे तर प्रसाधनाने लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देऊन शेलगावकरांना खड्डा मुक्त रोड तयार करून देण्याची भावना व्यक्त केली.