धाराशिव प्रतिनिधी ( संतोष खुने) :-:
दि.१२/०६/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, यांच मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार सो यांचे आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करिता स्थागुशाचे पथक रवाना होवुन पेट्रोलिंग करीत येरमाळा येथील चौकात आले असता पथकास गोपनिय बातमी मिळाली की इसम नामे शाम शिवाजी काळे हा आंदोरा येथे जात पंचायतसाठी आलेला असुन तो आंदोरा येथील हॉटेल निसर्ग समोर थांबलेला आहे व त्याचेजवळ एक गावठी कटटा आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदरची माहिती वरीष्ठांना कळवुन लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता माहिती मधील इसम हॉटेल निसर्ग चे समोर थांबलेला दिसला. पथकातील स्टाफने तात्काळ गाडीतुन उतरून त्यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गावाबाबत विचारले असता त्याने त्याचे नाव शाम शिवाजी काळे वय ३२ वर्षे रा . झगडेगल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव असे सांगीतले त्याची अंगझडती घेतली असता शाम शिवाजी काळे याचे कंबरेला खोवलेला एक लोखंडी धातुचा त्यास लाकडी पिस्टल ग्रीप असलेला गावठी कटटा व त्याचे पँटचे खिशात दोन जिवंत काडतुसे असे ४६,०००/- रू. किमतीचे मिळुन आले. नमुद आरोपीची वैदयकीय तपासणी करून त्याचेविरूध्द पोलीस ठाणे कळंब येथे अवैधरित्या शस्त्र बाळगलेप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोह/ विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक / बबन जाधवर चापोअं / रोहीत दंडनाईक, यांचे पथकाने केली आहे.