दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :-
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात व विटा शहरात आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध असणारे आणि राज्याच्या भेसळखोरीवर प्रहार करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भीतीचे पडसाद विटा शहरात दिसून येत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या भीतीने पान टपऱ्यांना लागतात की टाळे; अशी अवस्था सध्या दिसून येत आहे,तर गेल्या २० दिवसांपासून सर्व विटा शहरातील पान टपरी चालकांनी तुकाराम मुंढे यांच्या टीमच्या भीतीने आपले शटर डाऊन केले आहे, भेसळखोरांवर कडा प्रहार करत सर्वसामान्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी राज्यातील निद्रिस्त अधिकाऱ्यांना जागी केली आहे. एमडीए मार्फत, दुध.दुग्धजन्य पदार्थ अन्नधान्य औषधे यातील भेसळ चव्हाट्यावर आणण्यासाठी गुटख्यावर कारवाईचा सिलसिला सुरू आहे. या कारवाईमुळे भेसळखोरींची धाबे दणाणले असून या भेसळीला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही नाईलाजास्तव कारवाईसाठी मैदानात उतरावे लागले आहे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धाडसी कारवाईमुळे सर्वसामान्य शेतकरी सामान्य जनता आनंदी आहे. तर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. विटा शहरापासून ग्रामीण भाग व वाढीवस्त्यापर्यंत या कारवाईचे पडसाद पाहायला मिळत असून आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांची कारवाई याच्या चर्चा भीती आढळत आहे. खानापूर तालुक्यातील आयुक्त मुंडे यांचे कौतुक होत असताना हॉटेल किराणा दुकान मेडिकल दूध सेंटर पान टपऱ्यावर मागील काही दिवसापासून या तालुक्यात अन्न व औषधच्या पथकांच्या अधिकाऱ्यांच्या धाडी त्यांच्या कारवयाचा याची चर्चा आहे. यातून अनेक अफवाही पसरविल्या जात आहेत. अद्याप पर्यंत खानापूर तालुक्यात कारवाई झाल्याचे चर्चा जोरदार सुरू आहे कारवाईच्या भीतीपोटी अनेक हॉटेल किरण दुकान पान टपऱ्या काही ठिकाणी सील करण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी शटर डाऊन, होत असल्याचे पाहायला मिळत आहे. होलसेल गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे दिसून येत असल्याने ते विटा व खानापूर तालुक्यातील गायब झाले आहेत, चोरी चोरी चुपके चुपके त्यांचे उद्योग सुरू आहेत की काय? सध्या विटा शहरात गुटखा पूर्ण बंद आहे.मावा दावा अशी चर्चा होत आहे, आयुक्त मुंढे यांचे नाव आणि त्यांच्या कारवायांचा उल्लेख दिवसा दिवस उंचावत असून त्यांच्या नावाची दहशत काय असते? याची प्रचित ग्रामीण भागात पोचली आहे. खानापूर तालुक्यात व अन्य तालुक्यात अन्नपदार्थातील भेसळ गुटख्याची सर्रास होणारी विक्री हे प्रश्न गंभीर आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ॲक्शन मोडमुळे अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातही कारवाया करत असल्याचे दाखवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. विशेष म्हणजे अनेक गावात आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पथक असल्याची बातमी येत आहे आणि ती वाऱ्यासारखी पसरते आणि त्याच क्षणी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या क्षेत्रात येणाऱ्या दुकानांचे शटर बंद होते. कारवाई झाल्याचे भेसळ पकडल्याच्या अफवांनाही ऊत येत आहे, त्यामुळे सध्या तरी तुकाराम मुंढे यांच्या भीतीने विटा शहरात पान टपऱ्या बंद आहेत तर काही ठिकाणी अजूनही दुकाने सील केली आहेत. या भीतीने असे म्हणावे शटर डाऊन,