दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार:- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहराचे व खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल विद्यमान आमदार श्री सुहास भैय्या बाबर यांची कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या सिनेटपदी नियुक्ती झाल्याबद्दल विटा शहरातील विटा नगरपालिका शिंदे शिवसेना गटाचे नेतृत्व जपणारे युवा नेते विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री अमोल दादा बाबर यांच्या उपस्थितीत विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे उर्फ (काकी ) यांच्याही प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला,या कार्यक्रमास विटा नगरपालिका शिंदे शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका व कार्यकर्ते तसचे विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या सह विटा नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी अधिकारी वर्ग विटेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक श्री संजय भिंगारदेवे यांनी सर्व नगरसेवक नगरसेविकांना बरोबरीने घेऊन नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे उपनगराध्यक्ष अमोल दादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता, आमदार सुहास बाबर यांचा सत्कार सोहळा , जेष्ठ नगरसेवक श्रीकृष्णात आण्णा गायकवाड यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात पार पडला,या वेळी अनेक नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी यांनी आमदार सुहास बाबर यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले,व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,तसेच जेष्ठ नेते विलास बापू कदम यांनी सुहास भैय्या आता तुम्ही नक्कीच मंत्री होणार याचा विश्र्वास आम्हाला आहे,म्हणत तुमच्या कामाची पोच पावती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील आणि मंत्री पदाच्या शहरातील भविष्यात पुढे तुमचे नाव असेल असे म्हणाले, या वेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, आज माझा सत्कार करताना मला बरेच काही गोष्टी आठवल्या की, विटा नगरपालिकेत आज आपली सत्ता येऊन पाच ते सहा महिने झाले, आता मात्र आपल्याला कामात हलगर्जीपणा करून चालणार नाही, प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात जोमाने कामाला लागा, विटा नगरपालिका निवडणुकीच्या काळात आपण जे विटेकरांना शब्द दिला आहे तो शब्द मला आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहेत, पाणीपट्टी घरपट्टी टप्प्याटप्प्याने आपण कमी करणार आहोत, विटा शहरासाठी दररोज पाणी सुटले पाहिजे, त्यासाठी जे मला करावे लागेल ते मी नक्कीच करेन, तसेच विटा शहरात ओढापत्रावरती जे बांधकाम आहे जर हे बांधकाम अडथळा येत असेल अथवा ट्राफिक साठी अडथळा येत असेल भविष्यात पावसाळा आहे ओढ्या पात्रातून पाणी साचून न रहाता सरळ सुसाट वेगाने गेले पाहिजे , येणारे अडथळे दूर केले पाहिजेत, तसेच विटा शहरात आपल्याला लवकरच ट्राफिक मुक्त विटा शेअर करायचा आहे यासाठी रस्त्यावर येणारे अडथळे वेळप्रसंगी अडचणी आल्या तर दूर करा, रस्त्यावरील गाडे या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल त्यांनाही पर्यायी मार्ग दिला जाईल असेही यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, माझ्यावर पडलेली जबाबदारी विटा नगरपालिका निवडणुकीच्या काळात मी जे आश्वासन विटेकरांना दिलेला आहे ते शंभर टक्के पूर्ण करणार, त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे, नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे व उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनाही कानमंत्र देत कामाला लागा असे म्हणत त्यांनी विटा नगरपालिका हद्दीमध्ये एकूण गाडे किती आहेत, नळ पाणीपुरवठा कनेक्शन किती आहेत, यावर एक नजर मारत संबंधित अधिकाऱ्यांना सर्वे करून या संदर्भात ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले, कोणतेही काम करत असताना थोडा त्रास होतो पण नंतर सई सलामत आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही कोणाला त्रास द्यायचा नाही, परंतु यातून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी आपल्या विचार भाषणात व्यक्त केले, यावेळी अनेक नगरसेवक नगरसेविका यांच्याशी संपर्क साधून त्यांनी समस्या जाणून घेतली, ज्येष्ठ नेते नगरसेवक नंदकुमार पाटील, यांनाही काका मी तुमच्या पाठीशी आहे तुमचं कोणतंही काम माझ्या हातून थांबणार नाही असे म्हणत तुमच्या विद्यालयासाठी जी काही मदत लागेल ते मी नक्की करीन असे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ सिनेट पदी निवड नियुक्ती झाल्याबद्दल आपले म्हणणे स्पष्ट सांगितले, या वेळी विटा नगरपालिकेचे प्रशासक अधिकारी यांना सूचना जारी केल्या, मी आपणास विनंती करतो आणि सूचना देतो कधीही माझा कार्यक्रम असताना नगरपालिकेमध्ये आपण जे पहिल्यापासूनच बाबर कुटुंबाशी एक निष्ठ आहेत ते सर्व जेष्ठ नगरसेवक यांना माझ्याबरोबर माझ्या व्यासपीठावरती विराजमान झाले पाहिजेत यासाठी व्यासपीठावर जास्त खुर्च्या ठेवत चला, माझ्यापेक्षा हे माझे समोर बसलेले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि जेष्ठ सन्माननीय यांच्यामुळे आम्ही आज पदावर आहोत दिवस रात्र आमच्यासाठी हे सर्वजण काम करत आहेत, असेही या वेळी सांगितले, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या सिनेटपदी नियुक्ती झाल्याबद्दल जे जे काही शालेय हायस्कूल कॉलेज या संदर्भात आपल्याला तांत्रिक अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याच्या साठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असेही यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, या वेळी जेष्ठ नेते नगरसेवक नंदकुमार पाटील, कृष्णात अण्णा गायकवाड, श्री विनोद गुळवणी, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, नगरसेवक संजय भिंगारदेवे, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.