दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
पॅरा स्पोर्ट्स क्षेत्राला चालना देण्यासाठी पॅरा बोकिया असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच “पॅरा बोकिया अवेअरनेस कॅम्प” चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. ७ जून रोजी सकाळी १० वाजता ससाणे ग्राऊंड, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
पॅरा बोकिया असोसिएशन महाराष्ट्राशी संलग्न असलेल्या पॅरा बोकिया असोसिएशन कोल्हापूरतर्फे तसेच पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व पॅरा बोकिया या खेळाबाबत जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात विविध मार्गदर्शन सत्रे, प्रात्यक्षिके तसेच खेळाडूंना प्रेरणा देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमींनी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.