
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) -: आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी जनजागृती बैठक उत्साहात पार पडली.
यावेळी समितीचे समन्वयक विकास बनसोडे, बाळासाहेब माने, राजाभाऊ राऊत, सुनील वाघमारे, भालचंद्र कटारे आणि उमाजी गायकवाड अक्षय बनसोडे (छोटू)यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आरक्षण आणि भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.
बैठकीत दि. २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे आयोजित संविधान बचाव व आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चात येडशी, भीमनगर व परिसरातील सर्व आंबेडकरवादी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, आरक्षण आणि संविधानाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असून प्रत्येक आंबेडकरवादी नागरिकाने आपल्या कुटुंबीयांसह, नातेवाईकांसह व सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा.
या बैठकीस पत्रकार संतोष खुणे, मिथुन शिंदे, उमेश ओव्हाळ आणि संदीप गायकवाड यांच्यासह भीमनगर व येडशी परिसरातील अनेक भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव
