दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -:सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत घडलेली घटना अशी की, विटा शहरातील जूना वासुंबे रोड लागत असलेल्या मनिषा संजय तारळेकर. ( राहणार विटा,) यांचे मालकीचा चांदीचा सात घोड्यांचा रथ ,काचेचे चौकट बनविण्याकरीता घरी आल्यानंतर ती त्यांनी त्यांच्या घरातील कपाटा मध्ये झाकून ठेवलीली असताना यातील अटक आरोपी हिने यातील फिर्यादी यांची पत्नी अक्षता या घरी नसलेल्याचा फायदा घेऊन घरात अनाधिकृत प्रवेश करून घरातील कपाटातील एक किलो चांदीचा रथ , मुद्दाम लबाडीने चोरुन नेले आहे, म्हणून वैगैरे मजकूरांचा वर्दीजबाब यातील फिर्यादी हेमंत अशोक लाटणे यांनी दिल्याने या फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार , सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, विटा उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार , यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास करत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली, याच वेळी विटा पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अभिजित संभाजी कोळी गोपनीय बातमीदराकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे पूजा काकासाहेब माने ( वय वर्षे ३५; राहणार जूना वासुंबे रोड विटा ,ता.खानापूर, जिल्हा सांगली,यांनी गुन्हा केला असल्याबाबत माहिती मिळाली,ही माहिती मिळाल्याने लागलीच विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी व पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता,सदर महिलेने विटा पोलीस ठाणे हद्दीत या घरातील घरफोडी मीच केली आहे असे कबुली जबाब विटा पोलीसांना दिले.महिलेने दिलेल्या जबाब अनुसार सहा घोडे असलेला चांदीचा रथ अंदाजे १ लाख ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विटा पोलीस पथकाने या महिलेपासून जप्त करण्यात आला आहे, ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम सह विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार अभिजित कोळी, अमोल पाटील. महेश संकपाळ.विलास मोहिते. उत्तम माळी,अक्षय जगदाळे, महेश देशमुख,किरण खाडे, वैभव कोळी, यांनी ही दमदार कामगिरी करत सदर या चोरी प्रकारणातील संशयित महिला् पूजा काकासाहेब माने हिला ताब्यात घेतले.
