दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-आकाश विनायक राठोड,अशोक जानराव राठोड,अतुल राजेंद्र पवार, प्रल्हाद राठोड इतर पाच इसम सर्व रा. जहागीरदारवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.06.06.2026 रोजी 19.00 वा. सु.रेल्वे ब्रिजजवळ जहागीरदारवाडी शिवारात रोडवर फिर्यादी नामे-अविनाश दिंगबर शिंदे, नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण हे स्टाफ सह शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून वाहन आडवे लावुन तुम्ही येथे केस करायच्या नाही असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश शिंदे यांनी दि.07.06.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 221, 126(2), 189(2), 190, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.