दर्पण न्यूज कोल्हापूर :- आनिल पाटील
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावाच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी ६५ लाख रुपयांच्या निधीतून सोलर हायमास्ट दिव्यांना मंजुरी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
या सोलर हायमास्ट दिव्यांमुळे गावातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसर अधिक प्रकाशमान होणार असून नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. तसेच वीज बचत व पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
“प्रकाशमान गाव, सुरक्षित गाव” या संकल्पनेला बळ देणारा हा निर्णय असल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचे कौतुक केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कसबा वाळवा तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.