

दर्पण न्यूज मिरज (अभिजीत रांजणे):- महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार व लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव मा. फारूकभाई जमादार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माजी मंत्री तथा मिरजेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ११८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
याप्रसंगी मा. सुमनताई खाडे वाहिनी, मा. मंजरीताई सुधीर गाडगीळ, महिला व बालकल्याण सभापती मा. बानू जमादार, मा. योगिता राठोड, मा. फिरोजभाई जमादार, मा. डॉ. महेशकुमार कांबळे, मा. आनंदा देवमाने, मा. आकाराम पप्पू कोळेकर, मा. अस्लम पप्पू आत्त्तार, मा. उमेश हारगे, मा. अस्लम बाडवाले, मा. शाहीद सतारमेकर, मा. दस्तगीर बावा यांच्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधीकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
