
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीत सतत रहदारी मार्ग आणि मेन १०० फुटी रोड म्हणजेच विटा कुंडल रोडवरुन दुपारच्या वेळेत विटा शहरातील एका पत्रकार समावेत व विटा नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती भाजपचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक जेष्ठ नेते फिरोज भैय्या तांबोळी हे त्यांच्या दुचाकी मोटरसायकल विटा कुंडल रोडवरुन कुंडलच्या दिशेने जात होते . रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका झाडाला एक विवाहित महिला मनामध्ये संतापची लाट डोळ्यात अश्रू, व जगून काय फायदा असे म्हणत या महिलेने आपल्याच गळ्यातील ओढणी रस्त्याकडेला असणाऱ्या एका झाडाला बांधत ती महिला त्या गळ्यातील ओढणीने गळफास लावून सतत रहदारीच्या मार्गावर असणारे शंभर फुटी रोड पासून काही अंतरावर ही महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत होती तेवढ्यात माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते फिरोज भैय्या तांबोळी यांचे लक्ष त्या महिलेच्या चाललेल्या या प्रकाराकडे गेले. फिरोज भाई यांच्या लक्षात आले ही महिला या झाडाला गळ्यातील ओढणीने गळफास लावून आत्महत्या करत असल्याचे लक्षात आले थोडाही विलंब न लावता त्यांनी स्वतःची गाडी त्या दिशेने परत घेतली काही क्षणात या महिलेचा जीव जाणार ती गळफास लावून घेणार तेवढ्यात फिरोज भाई यांनी तातडीने त्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या एका दांपत्यास एका मायमाऊलीत उभा केले व झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेला त्या मायमाऊलीस धरायला लावले आणि सदर त्या माऊलीने आत्महत्या करणाऱ्या महिलेला विचारले की तू का आत्महत्या करत आहे याचे कारण काय कशासाठी ही टोकाची भूमिका तू घेत आहे. त्याचवेळी माजी नगरसेवक फिरोज भाई तांबोळी यांनीही त्या महिलेला तुमच्या मिस्टरांचा नंबर मला द्या मी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या ठिकाणी येण्यास विनंती करतो यावेळी त्या महिलेने आपल्या पतीदेवचा नंबर दिला फोनवरून तिच्या पतीशी फिरोज भैया यांनी बोलणे केले व तुम्ही असाल तिथून ताबडतोब विटा कुंडल रोड 100 फुटी जवळ या असे सांगत ताबडतोब त्या महिलेचा पती घटनास्थळी आला, सदर हा सर्व घडलेला प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या दांपत्य व फिरोज भाई तांबोळी यांनी सविस्तर त्या महिलेच्या पतीला सांगितले, दोघांनाही एकत्र करून दोघांचीही समजूत काढून त्या पती-पत्नीला फिरोज भैया यांनी पत्नीचा राग काय आहे हे पतीला समजावून सांगितले थोडक्यात माझं लक्ष गेलं नसतं तर तुमच्या पत्नीचे काय झालं असतं असे म्हणत त्यांनी त्यांच्या पति वरही राग संताप व्यक्त केला, दोघांचीही समजूत काढून म्हणतात ना देव कोणाला कोणत्या रूपामध्ये पाठवल हे सांगता येत नाही, खरंच काही दिवसांवर आषाढी एकादशी आणि दिंडी सोहळा वारीचा मोसम अशाच धार्मिक काळात विठ्ठलाप्रमाणे एका महिलेचे प्राण वाचवण्यासाठी देवासारखे फिरोज भाई तांबोळी आणि त्यांचे सहकारी मित्र धावून आल्याने या महिलेचे प्राण वाचले, सदर या महिलेने झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्याचे कारण मात्र सांगितले नाही, रागाच्या भरात कधी कोण काय करेल हे सांगता येणार नाही हे मात्र दृश्य या आजच्या घडलेल्या प्रकारामध्ये दिसून आले, माजी नगरसेवक फिरोज भैया तांबोळी व त्यांचे सहकारी मित्र पत्रकार यांचे महिला वर्गातून आणि विटेकर नागरिकांतून एका महिलेला गळफास घेताना वाचवल्याने त्या महिलेचा जीव वाचवल्याने व पती-पत्नीची समजूत काढून या घटनेपासून दूर केल्याने एक दिलाने एक विचाराने संसार करा नको ते खुळ डोक्यात घेऊ नका असे म्हणून फिरोज भैया तांबोळी ते त्यांच्या कामासाठी रवाना झाले, सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली की नाही हे माहित नाही मात्र या विषयाची चर्चा विटा शहरात सर्वत्र होत होती.
