दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव जिल्हयातील सोलार प्लॅट व पचनचक्कीचे संबंधीत असणा-या प्रकल्पातून तेथील साहित्य, वायर, चोरीस जाण्याचे प्रकार घडले होते. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद इज्जपवार यांना आदेशित केले होते.
दि ०७.०६.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून | प्राप्त माहितीवरून येडशी ता जि धाराशिव येथून ०२ संशयित इसमांना त्यांचे टाटा सुमो वाहनासह शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदारांचे सोबत मिळून तेरखेडा, रुईभर, कौडगाव, ढोकी, ता धाराशिव साबळेवाडी व आरसोली ता भूम, गौरगाव व मस्सा ता कळंब या शिवारात सोलर तसेच पवनचक्की प्लांटवरील तांब्याच्या तारा असणा-या केबलची चोरी केली असल्याचे कबूल केले. ताब्यात | घेतलेल्या आरोपींकडून एकूण १९५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व गुन्हयात वापरलेली टाटा सुमो असा एकूण ०६,४२,४०० रूपयांचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे. नमुद आरोपींकडून चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवाजी उर्फ नाना संजय काळे रा खामकर पारधी पेढी, ता वाशी, जि धाराशिव व अन्य एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी असून नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कारवाईस्तव पोस्टे धाराशिव ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, पोकॉ १०२९ कोळी, चापोह रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.