दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
राज्याचे आरोग्यमंत्री यांचा सोमवार दि. ८ जून रोजी कोल्हापूर व मुंबई दौरा निश्चित करण्यात आला आहे. सकाळी ७ वाजता भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील निवासस्थानावरून ते शासकीय वाहनाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शरण साहित्य अभ्यास केंद्र इमारतीकडे रवाना होणार आहेत. सकाळी ८.१५ वाजता शरण साहित्य अभ्यास केंद्र इमारतीच्या लोकार्पण व उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सकाळी ९ वाजता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर येथे आगमन करून सकाळी ९.३५ वाजता इंडिगोच्या 6E-7042 या विमानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता नवी मुंबई येथे आगमन झाल्यानंतर तेथून शासकीय वाहनाने मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाणार असून पुढील दौरा राखीव ठेवण्यात आला आहे.