


दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे युवा नेते ऋषी भैय्या टकले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी चषक 2026 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या क्रिकेट स्पर्धेला युवा नेते, डब्बल महाराष्ट्र केसरी , माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार दादा पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यावेळी ऋषी भैया टकले यांनी चंद्रहार दादा पाटील , उद्योजक मदन डाळे आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
या भेटीवेळी चंद्रहार दादा पाटील यांनी ग्रामीण भागात मोठे बक्षीस ठेवून क्रिकेट स्पर्धा भरवून खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ऋषी भैय्या टकले यांचे कौतुक केले. आजच्या धावपळीच्या काळात खेळाला महत्त्व दिले पाहिजे. या स्पर्धेतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी, असे प्रोत्साहन ही चंद्रहार पाटील यांनी केले.
यावेळी भिलवडीचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर, भाजपचे नेते पिंटू पुजारी, टकले सर , बबन माने, संजय जाधव, पिट्या मोटकट्टे, ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.