दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भेंडवडे गावठाण, सागर भेडवडे, राजधानी भेंडवडे, या गावालागत असणारी जगदाळे वस्ती, आणि जानकर मळा, सह अन्य परिसरात बिबट्या हा प्राणी वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने, या गावातील नागरिकांनी तातडीने वन विभागास संबंधित अधिकारी यांना माहिती दिली, यावेळी रविवारी सकाळी सहा वाजता वन विभागाच्या अधिकारी पवळे साहेब व त्यांचे सहकारी कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले, त्यांनी सदर या परिसरात बिबट्या वावरत आहे का? याची खात्री करून नागरिकांच्या कडून माहिती घेतली, यावेळी वन विभागाच्या अधिकारी यांना सांगितले की आम्हाला या परिसरात बिबट्या दिसून आला तर काहींनी निदर्शनास आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी बिबट्या या परिसरात असल्याची माहिती व खात्री पटल्यानंतर संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थ व नागरिकांना व शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सदर या भागात बिबट्या निदर्शनास आला आहे अशा भागामध्ये जाताना काय खबरदारी घ्यावी याही सूचना ग्रामस्थांना दिल्या. शेतात ऊसाला पाणी पाजायला जाताना आपण काय खबरदारी घ्यावी. व काय सतर्क कसे राहावे अशाही सूचना दिल्या. बिबट्या दिसल्यास कोणीही पळू नये. शेतामध्ये जाताना टॉर्च आणि मोबाईलवर मोठ्याने गाणे लावणे अथवा आवाज वाजवणे. आजूबाजूला कोणतीही अफवा पसरू नये. आपल्या वरती विश्वास ठेवू नये. असे म्हणत या गावातील लोकप्रतिनिधी तसेच पोलीस पाटील यांना बरोबरीने घेऊन सदर या भागातील परिसर संबंधित वन विभाग अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी करत. सूचना जारी केल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेही यावेळी सांगितले. संबंधित वन विभागात अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे व सूचनेचे पालन करावे.
भेंडवडे गावठाण सागर भेंडवडे राजधानी भेंडवडे येथिल नागरीकांना सुचना देण्यात येते कि, गावालगत असणारी जगदाळे वस्ती आणि जानकर मळा येथे बिबट्या हा प्राणि वावरत असल्याचे अनेक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.