
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाईचा धुमधडाका लावला आहे, अक्षरशः पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत, सविस्तर दर्पण न्यूजचे विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना मिळालेली माहिती अशी की, शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छपा टाकून सुमारे २१ हजार ७१६ रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली आहे, या प्रकरणी सागर राजेंद्र म्हेत्रे,( वय वर्षे ३६, राहणार चौंडेश्वरी नगर विटा). गणेश अशोक तावरे ( वय वर्षे ४३.राहणार मुंढे मळा, विटा), या दोघा विक्रेत्यांसह विटा शहरासह खानापूर तालुक्यात गुटखा पुरवठा करणारे निलेश रास्ते ( राहणार विटा).आणि जंगम ( राहणार लेंगरे..). या दोन विक्रेत्यांसह एकूण चार जणाविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्नसुरक्षा अधिकारी स्मिता हिरेमठ यांच्यासह पथकाने विटा येथील सागर म्हेत्रे यांच्या महात्मा गांधी शाळेजवळच्या सागर किराणा दुकानात व गणेश तावरे यांच्या दुकानावर छापा टाकला, विटा शहरात सदर तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांना संबंधित पथकाने सील केल्याचेही दिसून येत आहे, ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे दर्पण न्यूज प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना अन्नसुरक्षा अधिकारी स्मिता हिरेमठ यांनी दिली, त्यामुळे काही पानं टपरी चालकानी आपली दुकानेचे बंद केल्याचे सध्या तरी चित्र दिसून येत आहे, आता पथकाची नजर चोरी चोरी चुपके चुपके सुगंधी तंबाखू व गुटखा विकणाऱ्या विक्री त्यावर असून. यांच्यावर अशीच कारवाई केली जाईल,असे म्हणत टीमचे दमदार कामगिरी दिसून येत आहे.