दर्पण न्यूज पलूस भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे वतीने घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या साठीच्या वाचन स्पर्धेत कुमारी पालवी प्रशांत शेटे हिचा प्रथम क्रमांक आल्याची माहिती केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिलेली आहे 15 एप्रिल 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत या वाचन स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेचे हे 25 वे वर्ष होते या स्पर्धेत यावर्षी 35 विद्यार्थी सहभागी झालेले होते स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे प्रथम क्रमांक पालवी प्रशांत शेटे वीस पुस्तके द्वितीय क्रमांक सोहम सुशांत शेटे 17 पुस्तके आणि तृतीय क्रमांक कुमारी समीक्षा शशिकांत पाटील 14 पुस्तके उत्तेजनार्थ पुढील विद्यार्थ्यांना क्रमांक देण्यात आलेले आहेत प्रणव दिलीप पाटील दहा पुस्तके तर कुमारी श्रीशा धनंजय पाटील आठ पुस्तके या स्पर्धेत कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नव्हते भिलवडी औदुंबर धनगाव चोपडेवाडी येथील इयत्ता चौथी ते नववी या वर्गातील विद्यार्थी स्पर्धेत समाविष्ट झालेले होते बालकथा बालकविता अकबर बिरबलाच्या गोष्टी इतर संतांचे वांग्मय संस्कारक्षम पुस्तके व साने गुरूजीचीं पुस्तके गुरुजींची पुस्तके इत्यादी पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुस्तके एका विशेष समारंभात देण्यात येणार आहे सलग 25 वर्षे चाललेली ही वाचन स्पर्धा ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत.