
दर्पण न्यूज भिलवडी :-
अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित आदर्श व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते व उद्योजक शीतल किणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला.
प्रारंभी विघ्नहर्ता पुरस्कार प्राप्त गजानन नरळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले,संचालक महावीर वठारे गुरुजी,चंद्रकांत पाटील,संभाजी सूर्यवंशी,मुकुंद जोग,अजय चौगुले,सदाशिव तावदर,सचिव मानसिंग हाके,सचिव के. डी.पाटील,मुख्याध्यापक संजय मोरे,प्रताप पाटील,डॉ.एस.बी.शिंदे,
प्रा.एम.बी.पाटील,सुचेता कुलकर्णी,स्मिता माने,शंकर बल्लाळ आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिबीर प्रमुख डॉ.महेश पाटील यांनी केले.सुकुमार किणीकर यांनी स्वागत केले.शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.सौ.विद्या टोणपे यांनी आभार मानले.
प्रा.सुधीर वाटवे,संजय पाटील,सुबोध वाळवेकर,दिलावर डांगे,निलेश कुडाळकर, सुनिल ऐतवडे,गजानन चव्हाण सर,धनंजय साळुंखे,प्रियांका भगत,सूरज पाटील,आयेशा इनामदार,निधी जाधव,गौरी खुबीकर आदी प्रशिक्षकांचा भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.