
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):-
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विटा उपविभागिय पोलीस अधिकारी विपूल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे येथे विटा शहरातील व खानापूर तालुक्यातील तमाम सर्व मुस्लिम समाज बांधव एकत्रीत करुन बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक करण्यात आली, या वेळी विटा शहरात बकरी ईद साजरी करताना कायद्याचे पालन करावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेऊ नका, तसेच ईदगाह मैदानावर नमाज पठण वेळेत पूर्ण लक्षात घेता, शांततेत नमाज अदा करणे, तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, रिल्ससवर ,असे कोणतीही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी पोस्ट फॉरवर्ड करू नका किंवा स्टेटस ठेवू नका, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर , उघड्यावर कोणतीही कुर्बानी करू नये, तसेच रस्त्यावर कचरा घाणीचे साम्राज्य करू नका, पायधूळ होईल असं काहीच करू नका, विट्यातील मस्जिद जवळ नमाज पठण होणार असेल तर विटा पोलीस ठाणे गोपनीय विभागात माहिती देणे आवश्यक असते, तसेच विटा शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीसांचा रुट मार्ट घेत सुचनाही देण्यात आल्या, दंगा काबू पोलीसांचे पथकही या वेळी सतर्क असेल.विटा पोलीसांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, विटा पोलीसांची व पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सह गृह रक्षक दल टीमही बंदोबस्तासाठी सज्ज करण्यात आली आहे, सालाबाद प्रमाणे या वर्षी ही बकरी ईद उत्साहात व शांततेत पार करावी अशी सूचना विटा उपविभागिय पोलीस अधिकारी विपूल पाटील यांनी दिली. विटा शहर मुस्लिम बांधवांनी पहिल्यापासूनच अत्यंत चांगले सहकार्य पोलिसांना केले आहेत या शहरात कधीही जातपात धर्म न मनात हम सब एक है, हे ऐक्याचे प्रतिक म्हणून आपले कर्तव्य विटयातील मुस्लिम बांधवांनी जपले आहे. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील म्हणाले मी श्री गणेश उत्सवाच्या काळात पाहिले आहे ,विटा शहरातील गावभागात असलेले जुम्मा मस्जिद समोर गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली जाते, खरंतर हे ऐक्याचे प्रतिक म्हणून अत्यंत सर्व धर्म समभाव दिसून आले .तसेच मंडळाला लाईट ही मस्जिद मधून दिली जाते,, हे प्रेम सदभावाना समाधान कारक वाटले. असे म्हणत असे कायमच एक्याचे प्रतिक जपत रहा. असे म्हणत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत सर्व विटा शहरातील मुस्लिम बांधवांना बकरीच्या विटा उपविभागिय पोलीस अधिकारी विपूल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार बैठक घेऊन सदिच्छा शुभेच्छा दिल्या व वरिष्ठ यांच्या आदेशानुसार आपण सर्वांनी शांततेत बकरी ईद साजरी करावी असे आव्हान केले.