दर्पण न्यूज विटा/प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-:
लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल C.B.S.E. च्या विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत यश मिळवून यशाच्या परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत एकूण 374 विद्यार्थी बसले होते त्यातील 18 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आली आहेत. यामध्ये विराज विजय हावळे व राजवीर गणेश खंदारे या दोघांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक पटकावला तसेच मोनिका सागरेश्वर पाटील व वीर कपिल जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर रीयांश पंकज मांडवेकर व रुद्र चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच स्वरा गणेश पवार, श्रीशा सुशांत रावताळे अमिता संदीप पवार, राजनंदिनी संजय गायकवाड,श्रेयस सोमनाथ शिंदे,विराज उत्तम पाटील,अरुंधती सत्यवान पाटील, आयुष सचिन निकम, शौर्य निलेश माने, राजवीर प्रणित भिसे, सानवी सागर सिंह हजारे, मल्हार रोहित जाधव यांनी केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत उल्लेखनीय यश मिळवले.जिद्द, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर मिळवलेले यशच खरे यश असते हे विद्यार्थ्यांनी यश मिळवून दाखवून दिले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सदाशिवरावभाऊ पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष अँड.वैभवदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. पी.टी.पाटील सर,प्रशालेचे प्राचार्य माननीय. श्री. अवधूत खरात, उपप्राचार्य माननीय श्री. निलेश भोसले यांनी कौतुक केले. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. राजश्री चव्हाण तसेच स्पर्धा परीक्षा प्रमुख शुभांगी जाधव यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.