दर्पण न्यूज भिलवडी प्रतिनिधी :
वाळवेकर हॉस्पिटल सांगली यांच्या विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होणार मोफत उपचार आज शनिवार दिनांक 11 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे होणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर रवींद्र वाळवेकर यांनी केले आहे
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत होणारे मोफत उपचार जर कोणत्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज लागली तर पुढील उपचार होणार आहेत यूरोलॉजी विभाग मोफत उपचार, किडनीतील खडे मशीनद्वारे फोडण्याची सोय, किडनीतील मोठे खडे दुर्बिणीद्वारे काढण्याची सोय, प्रोस्टेट ग्रंथीची मोफत शस्त्रक्रिया, पित्ताशयाच्या पिशवीतील खड्यासाठी शस्त्रक्रिया असे उपचार होणार आहेत. हॉस्पिटल मधील इतर सुविधा जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया थायरॉईड ग्रंथींची शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपिक सर्जरी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया,आर्थोपेडिक शस्त्रक्रिया एंडोस्कोपी ची सुविधा मुळव्याध उपचार व शस्त्रक्रिया.
सर्व इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारक व एम एस ई बी कर्मचारी यांच्यासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.
वाळवेकर हाॅस्पिटल यांनी अनेक मोफत आरोग्य शिबिर राबवली आहेत. या शिबिरा पाठीमागचा उद्देश गोरगरीब व गरजूंच्यासाठी या योजनेचा लाभ व्हावा, असा आहे. जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ वाळवेकर यांनी केले आहे.