

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथील आळसंद कळंबी रोडवर माळरानावर आळसंद येथील वसंत तातोबा जाधव हे वृद्ध व्यक्ती नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळेत ऊसाला पाणी पाजण्यासाठी उसाच्या शेतात गेले होते. त्यावेळी उसाच्या चरीतून पाणी वाहत होते. या चारीमध्ये मेन सप्लाय लाइट्स डीपी मधून गेलेली मेन तार तुटून पडली होती. सदर वसंत जाधव हे पाणी पाजत पाजत पुढील सरीमध्ये गेले. यावेळी जाधव यांना पाण्यात पाय टाकल्याबरोबर विजेच्या तारेचा जोरात करंट लागला यामध्ये वसंत तातोबा जाधव, यांचा या तारेचा करंट लागून जागीच मृत्यू झाला, यावेळी वसंत तातोबा जाधव हे शेताच्या उसाच्या कडेला बांधावर पडले यावेळी त्यांच्या कुटुंबातली माऊली धावत उसाच्या शेताकडे पळाली. तसे वसंत जाधव यांच्या हालचालचालीकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लक्ष गेले परंतु वसंत जाधव यांची कोणतीच हालचाल दिसली नाही. यावेळी तिथे असणारे एका माऊलीने त्यांच्या मुलाला हाक मारली आबांना काहीतरी झालं पळत बाबा लवकर असे ओरडल्यानंतर सदर मुलगा जेवणाच्या ताटावरून उसाच्या शेताकडे पळत सुटला. यावेळी त्याच्या निदर्शनास शेताच्या चरीच्या पाण्यामध्ये विजेची तार तुटून पडले होती. काही क्षणात त्यांनी वसंत जाधव यांना उचलण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांच्या लक्षात आले की या तारेला करंट सुरू आहे. त्यांनी माऊलीला सांगितले पुढे पाण्यात येऊ नको मी माझ्या पद्धतीने बाहेर येतो. त्यावेळी ती माऊली तिथेच थांबली. मुलाने जाधव यांना खांद्यावर घेतले त्यावेळी त्या मुलालाही तारेचा धक्का जोरात बसला. पण ताकतीच्या जोरावर उसाच्या मुळीवर पाय ठेवून तो त्यातून बाहेर पडला. आईला सुद्धा किरकोळ तारेचा झटका बसला. थोडक्यांत माऊली आणि मुलाची सुद्धा प्राण वाचले. यावेळी मुलाने जाधव यांना शेतातून बाहेर आल्यानंतर जोरात वराडले लाईट बंद करावे बंद करा. तातडीने मेन वीज पुरवठा डीपीतून बंद करण्यात आला. यावेळी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी वस्तीकडे वर्दळ कमी होती. असे सांगत वसंत जाधव यांचा जर या ठिकाणी लोक असते तर जीव वाचला असता. अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांतून होऊ लागली. या घटनेनंतर आळसंद गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत, जाधव कुटुंबाला मदतीचा हात दिला. काही क्षणात महावितरण संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना घ्यावा घातला तुमची अक्कल किती काम करते तुमच्या ह्या भोंगळा कारभारामुळे आज माझ्या वडिलांचा जीव गेला. असे म्हणत त्याच्या मृत्यूस तुमचं महावितरण जबाबदार आहे. काही काळ तणावाचे वातावरण झाले. वसंत जाधव यांचा मृत्यूदेह आम्ही महावितरणच्या दारात आणून ठेवू अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली, सदर या घडलेल्या घटनेला महावितरण अधिकारी कर्मचारी कारणीभूत आहेत असे म्हणत त्यांचा हा भोंगळा कारभार समोर आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी दिलेली
माहिती अशी की. मागील काही दिवसापूर्वी आळसंद कळंबी रोडवरील हाच डिपीने पेट घेणार याच वेळी तार कट झाली होती यावेळी ठिणग्या उडाल्या होत्या. यावेळी आजूबाजूच्या उसालाही आग लागली होती. त्याचवेळी त्या परिसरात असणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांनी वीज वितरण महा अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिली होती. पण त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी वेळेत डीपी तारा बदलले असत्या वेळेत काम केलं असतं तर जाधव यांचा मृत्यू झाला नसता. सदर या घटनेनंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी उशीर पर्यंत विटा पोलीस घटनास्थळी पंचनामा करत होते. पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
—————–
आमदार सुहास बाबर यांची गावकऱ्यांनी भेट घेतली, संबंधित महावितरण अधिकारी कर्मचारी यांना गावकऱ्यांनी वस्तीकडे जाताना घेरावा घातला, काही काळ तणावाचे वातावरण, ग्रामस्थ व महावितरण अधिकारी कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल, वस्तीवर नातेवाईकांचा हंबरडा , थोडक्यात वाचला मुलगा व आई, उसाच्या शेतात विजेची तार तुटून पडल्याने तारेचा झटका बसल्याने यांचा जागीच मृत्यू. जाधव कुटुंबाला मदतीसाठी सामाजिक व राजकीय नेतेमंडळी तातडीने घटनास्थळी दाखल, महावितरण कार्यालयासमोर जाधव यांचा मृतदेह आणून ठेवणार, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.