दर्पण न्यूज मिरज सांगली -: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश दादा लाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत स्थायी समितीची मासिक सभा संपन्न झाली.
या सभेत जिल्हा परिषदे कडील सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण,या विभागावर विशेष भर देऊन सांगली जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्व विभागाचे सभापती व सर्व विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील गट विकास अधिकारी उपस्थित होते.