दर्पण न्यूज धाराशिव, प्रतिनिधी( संतोष खुणे) : एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हास्तरावर व्यापक जनआंदोलन उभारण्यासाठी आज धाराशिव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आगामी आंदोलनाचे नियोजन,जनजागृती आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी ३७ सदस्यीय समन्वय समितीची एकमताने घोषणा करण्यात आली.
समन्वय समितीमध्ये राजाभाऊ ओव्हाळ,धनंजय शिंगाडे, नितीन (बाप्पा) शेरखाने,कैलास शिंदे, संजयकुमार बनसोडे, विद्यानंद बनसोडे,ॲड. साबने,राजाभाऊ राऊत, सतपाल बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत,ॲड.गणपती कांबळे, हरिश डावरे, डी. जी. होसलमल,भाई फुलचंद गायकवाड (पाटील),बंडूभाऊ बनसोडे, अरुणभाऊ बनसोडे, शांतीनाथ शेरखाने,आनंद पांडागळे,ॲड. के. टी. गायकवाड,एस. के.चेले, भालचंद्र कठारे,अनिल हजारे, सुनिल गायकवाड, मनिष सोनकवडे,राजेंद्र निकाळजे, काका भंडारे,महादेव वाघमारे, विकास बनसोडे, धनराज सोनकवडे, सुनील वाघमारे,फकीरा सूरवसे, कुंदन वाघमारे, किशोर वाघमारे, बाबा मस्के, दादा सरवदे,राजश्री कदम आणि विजय बनसोडे यांचा समावेश करण्यात आला.
बैठकीत एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभर जनजागृती अभियान राबविणे, विविध सामाजिक संघटना, संविधानप्रेमी नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यावेळी दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व ५९ अनुसूचित जातींतील नागरिक, सामाजिक संघटना, युवक, महिला, विद्यार्थी आणि संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत समितीच्या प्रसिद्धी व जनसंपर्काची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राजाभाऊ राऊत,सोमनाथ गायकवाड, मुन्नाभाई,ओव्हाळ, कुंदन वाघमारे यांची प्रसिद्धीप्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली.