

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार)- : भारत सरकार तर्फे होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या अनुषंगाने विटा नगरपरिषदेकडून शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. विटा शहर हे स्वच्छतेत अव्वलस्थानी आहे यामध्ये सातत्य ठेवत 100% कचरा मुक्त शहर तसेच शहरातून कचरा विलगीकरण करून दररोज संकलन करणे, रस्ते स्वच्छता, गटार साफसफाई आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
*स्वच्छता हा संस्कार आहे.*
आपल्या शहराचा हा स्वच्छतेचा संस्कार अभिमानास्पद आहे. नगरपालिकेच्या सर्व उपक्रमात आपण योगदान देऊन सहकार्य करावे. व शहराला अधिक सुंदर करण्यासाठी सहाय्य करावे.
सौ. काजलताई म्हेत्रे
(नगराध्यक्षा, विटा नपा)
*विटा शहराला स्वच्छतेत देशात नंबर वन बनवणार*
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या देशपातळीवरील महत्वकांक्षी उपक्रमात पालिकेने सातत्य ठेवले आहे. आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पूर्ण करत आहेत. विटेकर नागरिक आपल्या शहराला अधिक सुंदर करण्यासाठी मदत करत आहेत आपले सर्वोच्च योगदान देत आहेत.100% कचरा मुक्त शहर, हगणदारी मुक्त शहर, आरोग्यास व पर्यावरणास घातक असलेले प्लास्टिक वापरावर निर्बंध असे असंख्य उपक्रम आणि शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या जोरावर आपण विटा शहराला देशात नंबर वन शहर करण्याचा निर्धार केला आहे
अमोलदादा बाबर
(उपनगराध्यक्ष, विटा नपा)
*शहर स्वच्छतेत नागरिकांनी योगदान द्यावे*
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानात विटा शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपले योगदान द्यावे. आपल्या सहभागाने शहराला स्वच्छतेत देशपातळीवर अव्वल करायचे आहे यासाठी सातत्यपूर्ण काम आपण करत आहोत. दररोज आपला घरगुती कचरा घंटागाडीमध्ये द्यावा. आणि आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यात आपण सक्रिय योगदान यावे
विक्रमसिंह पाटील
(मुख्याधिकारी, विटा नपा)
शहराच्या स्वच्छतेसाठी व आरोग्यदायी वातावरण निर्मितीसाठी शहरातील सर्व वॉर्ड मध्ये सातत्याने स्वछता मोहीम पालिकेच्या माध्यमातून घेतल्या जातात नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच “स्वच्छ विटा, सुंदर विटा” हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. त्यामुळे आपले योगदान महत्वपूर्ण आहे.
शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील सर्व नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत आणि नागरिक सक्रियपणे योगदान देत आहेत.