दर्पण न्यूज मिरज /सांगली : महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर या शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता बेळंकी येथे आगमन व ग्रामीण रूग्णालय बेळंकी या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता समित कदम, प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य पार्टी महाराष्ट्र, कदम बंगलो शिवाजीनगर, मिरज यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 2 वाजता सांगली शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता सांगली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता महालक्ष्मी मंदिर ता.करवीर, जि. कोल्हापूर कडे प्रयाण.