दर्पण न्यूज पलूस भिलवडी प्रतिनिधी : पलूस तालुक्यातील धनगाव येथील जय हिंद ग्रुपचे अध्यक्ष अवधूत राजेंद्र साळुंखे, शैलेंद्र हिंदुराव साळुंखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला.
अवधूत राजेंद्र साळुंखे, सुरज संपत मोहिते शुभम सदाशिव साळुंखे व शैलेंद्र हिंदुराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद ग्रुपच्या 23 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदीप आप्पांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला. यावेळी शुभम निकम, सत्यजित पिसाळ अमीर भैय्या पठाण,तुषार सूर्यवंशी अभिजीत सावंत,अभिजीत कौलगे हे उपस्थित होते. मतदारसंघांमध्ये प्रदीपआप्पा कदम हे आता विश्वासू आणि विकासासाठी आश्वासक असे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
प्रदीपआप्पा कदम यावेळी म्हणाले, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार कष्ट घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे आणि राज्याचा विकास करणे हे एकमेव ध्येय आपल्या पक्षाचे आहे. अजितदादांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण सर्वजण आमच्या सोबत आला आहात याचा आम्हाला आनंद आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षांमध्ये प्रवेश केला आहे त्या प्रत्येकाला संधी देण्याचा आणि विकास कामे करण्याचा प्रयत्न आम्ही पक्षाच्या माध्यमातून करू.
धनगावच्या नागरिकांनी या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचे स्वागत केले. जय हिंद ग्रुप चे अध्यक्ष अवधूत राजेंद्र साळुंखे यांच्यासह शुभम सदाशिव साळुंखे, अनिकेत विष्णू बोडरे, अतुल अनिल साळुंखे, महेश आत्माराम साळुंखे, रुपेश सुरेश केवळे, निलेश सुरेश कांबळे , गणेश बबन बोडरे, पराग बाळासो मोहिते, रोहित हणमंत बोडरे, युवराज संजय बोडरे यश संदीप रोकडे, मल्हारी मधुकर बोडरे, यश हणमंत मोहिते, करण दिलीप वायदंडे, सागर राजू मोहिते, विठ्ठल विष्णू बोडरे, सुधीर विलास रोकडे, रोहिदास नारायण रोकडे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला.
जय हिंद ग्रुप हा धनगाव परिसरामध्ये नावाजलेला ग्रुप असून अनेक समाज उपयोगी उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत. दिवाळीच्या सुट्टीत युवकांनी मोबाईल पासून दूर राहण्यासाठी धनगावचा पारंपरिक खेळ पट सोंगट्या हा जुनी परंपरा व सर्वांच्या मध्ये खेळी मेळी वातावरणात नेहमीच प्रोत्साहन देतो. तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य हे त्यांनी केलेले आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचा अवास्तव खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा धनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतिबा फुले यांची लहान मुलांना समजेल अश्या पुस्तकांचे वाटप करून समाज प्रबोधनाचे कामही या ग्रुपने केलेले आहे. नेहमी सामाजिक पद्धती जपणारा हा ग्रुप आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे नक्कीच या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.