दर्पण न्यूज विटा-खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विटा पोलिसांनी आता धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील भाईगिरी करणाऱ्या व पिस्टल वापरणाऱ्या अशा भाईला आता मुळापासून नष्ट उखडून टाकण्यासाठी विटा पोलीसांनी दबंग भुमिका घेतली आहे. सतत पायी पेट्रोलिंग, विटा शहरात व खानापूर तालुक्यात अवैध धंदे तसेच अमली पदार्थ विरोध करत असे उद्योग करणाऱ्यांवर ही धडाकेबाज कारवाई करत, विटा साळशिंगे रोड येथे रस्त्यावरील एका शाळेच्या परिसरात गांजा ओढणाऱ्या मोहम्मद सैफ.( वय वर्षे १९, राहणार विटा लखनऊ). असे या तरुणाचे नाव आहे. विटा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार अक्षय जगदाळे यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करत सदर विटा पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे, पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत,