
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (सिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्याची वाढ तर होताना दिसून येत आहे, दमदाटी प्रकार,तसेच हल्ले, किरकोळ कारणावरून वाद मारहाण, असे प्रकार घडत आहेत यातच विटा तासगाव रोडवर एका मंगल कार्यालयासमोर सांगलीच्या टीमने मोठी दमदार कामगिरी करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ( एलसीबी) यांनी केलेल्या कारवाईत मध्य प्रदेशातून विक्रीसाठी विटा शहरात आणलेल्या तब्बल चार पिस्तूल ( अग्निशस्त्रे) आणि जिवंत काडतुसांसह २ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सूर्यकांत यशवंत साळुंखे यांनी याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत ( पारे रोड बजरंग नगर विटा, येथील धीरज सतीश चव्हाण वय वर्षे २१ या तरुणाला) याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे पिस्तूल व काडतुसे सांगली एलसीबी पथकाला मिळून आली आहेत. सदर या आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे. त्याला या घातक शस्त्रांचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार !पाजी ! पूर्ण नाव माहित नाही राहणार सेंधवा , मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी ही शस्त्रे सॅक आणि त्याची दुचाकी असा एकूण २ लाख ६७ हजार४०० रुपयांचा मुद्देमाल जागीच जप्त केला. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमी तपसली असता, आरोपी धीरज चव्हाण यांनी जिल्ह्यात या शास्त्रांची ज्यादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने ती मध्यप्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर या संशयित आरोपीस एलसीबी पथकाने विटा पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून विटा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कोळी यांनी गुन्हा नोंद केला आहे.