
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी ( संतोष खुने) -:
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने येडशी येथील इंजिनिअर रामेश्वर पवार यांची युवक प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते तसेच धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यावेळी शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष जालिंदर पौळ, ,जितेंद्र कागदे, वाशी विद्यार्थी तालुकाध्यक्ष अंकित उकरंडे, अजित तोडकरी, अविनाश शिंदे, नितीन अंकुशराव, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
इंजिनिअर रामेश्वर पवार हे युवकांमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक व संघटनात्मक कार्यात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असून पक्षवाढीसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीनंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राज्यभर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.