दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने):-
दि ०१.०५.२०२६ रोजी पोस्टे तुळजापूर हददीत तुळजाभवानी मंदीरात भाविक महिलेच्या गळयातील गंठण चोरी केल्यावरून पोस्टे तुळजापूर गुरनं २१० / २०२६ क ३०३ (२) भान्यांसं अन्वये अनोळखी महिलांविरूदध | चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व | सदरचे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना आदेशित केले होते.
दि १५.०५.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून प्राप्त माहितीवरून पारगाव टोल नाका, वाशी येथून ०२ संशयित महिला व ०२ पुरूषांना त्यांचे स्कॉर्पियो वाहनासह शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदारांचे सोबत | मिळून तुळजापूर व येरमाळा येथे भाविक महिलांचे गळयातील गंठण / मणिमंगळसूत्र चोरी असल्याचे कबूल केले.