



दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी : स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या ‘यशवंत फेस्टिव्हल पलूस २०२६’ च्या चौथ्या दिवशी नागरिकांची झुंबड उडाली होती. पलूस शहरासह परिसरातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी गायिका श्वेता दांडेकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, लाईव्ह फायर साहसी खेळ, मनोरंजन साधने आणि खरेदीचा मनमुराद आनंद घेतला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक तरुण भारतचे संपादक शिवराज काटकर यांच्या हस्ते सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले. हा सेल्फी पॉईंट रसिकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू बनला आहे. श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा गायन व नृत्याचा श्रोत्यांना खेळून ठेवणारा तसेच नाचायला लावणारा लाईव्ह शो अत्यंत उत्साहात पार पडला. याचे उद्घाटन संदीप कुडचीकर, अमृत माळी, नगरसेवक धनाजी कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष तोफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, गणेशभैंया नलवडे, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, अभिजीत सावंत, अमीर पठाण यांच्या उपस्थितीत पार पडला . संयोजक प्रदीप आप्पा कदम यांनी उपस्थितांचा सत्कार केला.
पलूसकरांना फनफेअर आणि फेस्टिवलची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दैनिक तरुण भारतचे संपादक शिवराज काटकर यांनी पत्रकारांच्या वतीने लामन दिवा देऊन प्रदीप अप्पा कदम यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी पत्रकार तुकाराम धायगुडे, नितीन पाटील, वैभव माळी, घनश्याम मोरे, रियाज पठाण, अभिजीत रांजणे उपस्थित होते.
श्वेता दांडेकर यांच्या विशेष लाईव्ह शो आणि मनोरंजन कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत, नृत्य आणि विविध कलाविष्कारांनी सजलेल्या कार्यक्रमांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे महोत्सव परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. युवक-युवतींसह लहान मुलांनीही कार्यक्रमांचा आनंद घेत कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती.
रसिकांनी घरगुती साहित्य, कपडे, सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि विविध व्यावसायिक स्टॉल्सवर खरेदीसाठी महिलांनी विशेष गर्दी केली होती. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या फनफेअरमधील आकाश पाळणा, ड्रॅगन ट्रेन, टोराटोरा आणि विविध खेळांमध्ये मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
सायंकाळी आकर्षक रोषणाईमुळे उजळून निघालेला महोत्सव परिसर अधिकच खुलून दिसत होता. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी विविध स्टॉल्सना भेट देत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. अनेकांनी मोबाईलमध्ये कार्यक्रमांचे क्षण टिपत कलाकारांचे आणि आयोजकांचे कौतुक केले.
दरम्यान, ‘यशवंत फेस्टिव्हल पलूस २०२६’ मुळे संपूर्ण पलूस परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवसांतील विशेष कार्यक्रम, स्पर्धा आणि लाईव्ह शो पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
*प्रदीपअप्पा तुम आगे बढो*
गायिका श्वेता दांडेकर यांनी उपस्थित रसिकांना गाण्याच्या तालावर फिरकायला लावले. यावेळी त्यांनी प्रदीप आप्पा यांना डॉन या गाण्यावर नाचण्याचा आग्रह केला परंतु प्रदीप अप्पांनी उपस्थित रसिकांना हात उंचावून अभिवादन केले. आणि रसिकांनी “पलूस नगरीत एकच दम! प्रदीप आप्पा कदम, प्रदीप आप्पा कदम!” प्रदीप आप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है|
अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या.