दर्पण न्यूज मिरज/सांगली : जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, 13 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत 11 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना) सन 2025-26 अंतर्गत माहे मार्च 2026 अखेरच्या कामांना व खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना) सन 2026-27 साठीचे नियेाजन आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, अशी या सभेची विषयसूची आहे.