दर्पण न्यूज मिरज / सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील दावापूर्व 3173 प्रकरणे तडजोडीने, तसेच सर्व न्यायालयातील मिळून 439 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 3612 प्रकरणे निकाली करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये 13 कोटी 55 लाख 59 हजार 762 रूपये रकमेची वसूली करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष अदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दि. 9 मे रोजी महालोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष अदिती उदय कदम यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून आपला मोलाचा वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावी असे सांगून त्यांना संपूर्ण लोकअदालतीची रूपरेषा सांगितली. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 व्ही. डी. निंबाळकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस. एम. चंदगडे, जिल्हा न्यायाधीश – 3 एस. आर. पडवळ, सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकात माने व पदाधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे उपस्थित होते.
या लोक अदालतमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश क्र. २. एस. एम. चंदगडे, जिल्हा न्यायाधीश क्र. ३ एस. आर. पडवळ, जिल्हा न्यायाधीश क्र. ५ एम. एम. पाटील, कौटुंबिक न्यायाधीश एस जे. घरात, चौथे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन. के पाटील, ११वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. आर. कल्हापुरे, १२ वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. व्ही. खुलपे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. के. करवंदे, निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, ४थे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जे. एस. मकानदार, ५ वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओ.एस. शास्त्री, यांनी काम पाहिले.
अॅड. विजय गाडेकर, अॅड. राजकुमार पाटील, अॅड. प्रभा दुर्गाडे, अॅड. पुरूषोत्तम बेंद्रे, अॅड. संजय रणसिंग, अॅड धनपाल येळमंते, ॲड. अर्चना उबाळे, अॅड. सर्जेराव मोहिते यांनी पॅनेल अॅडव्होकेट म्हणून काम पाहिले.
लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी संपूर्ण लोकअदालतीचे नियोजन केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शंकरराव वानखेडे, वरिष्ठ लिपीक संतोष खंदारे, कनिष्ठ लिपीक नितीन आंबेकर, विजय माळी उपस्थित होते. या लोकअदालतवेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पुढील राष्ट्रीय लोक अदालत दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली तर्फे करण्यात आले आहे.