दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोमवार, 11 मे रोजी दुपारी 3 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व पावसाळा 2026 व संभाव्य पूरिस्थिती पूर्व तयारी आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 वाजता कृषी विभाग, कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 5 वाजता राधानगरी तालुक्यामध्ये शेतकरी गटांच्या माध्यमातून मत्स्यपालन व मत्स्यनिर्यात केंद्र उभा करण्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीस उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 8.40 वाजता रेल्वे स्टेशनवर आगमन. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.