दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
दि.19.04.2026 रोजी रात्री नाकाबंदी दरम्यान नळदुर्ग पोलीसांना पाहुन अम्ली पदार्थ तस्करी करणारे आरोपी त्यांचे ताब्यातील हशिश ऑईल असलेली बॅग त्यांचे कार मधून फेकुन पळुन गेले होते. त्यांनंतर घटनास्थळा वरुन सदर अम्ली पदार्थ जप्त करुन नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे गुरन 114/2026 NDPSACT कलम 8 (क),20(ब),(ii),(C) 25,29 अन्वये दहा कोटी आडतीस लाख वीस हजार रुपये कि.चे अम्ली पदार्थ हशिश ऑईल तस्करीचा गुन्हा दाखल करुन मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, मा. पोलीस निरीक्षी श्री विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखेस धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासांतर्गत आरोपीतांची नावे निष्पन्न करुन यातील दोन आरोपीतांनी यापुर्वी नाशिक मालेगाव येथुन अटक करण्यात आली होती. परंतु सदर प्रकरणातील हशिशऑईल कोठून आणले व ते विक्री करणारे आरोपीतांचा धाराशिव पोलीसांकडून शोध सुरु असताना तांत्रिक तपासात ओडीशा राज्यातील हशिश ऑईल विक्री करणारा मुख्य आरोपी नामे प्रसेनजित खिरमहन दास, राज्य ओउीसा याची माहिती मिळाली परंतु त्याचे फक्त नावच निष्पन्न झाले तो कोठे राहतो? तो कसा दिसतो? त्याची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे आव्हाण धाराशिव पोलीसां समक्ष होते. परंतु दि. 06.05.2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने पोनि इज्जपवार स्थागुशा धाराशिव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार/ विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, रोहीत दंडनाईक यांचे पथक ओडीसा राज्यात रवाना होवून सदर आरोपीचा शोध घेताला असता सदर आरोपी हा ओडीसा राज्यातील अतिशय दुर्गम पहाडी भागातील नक्षल प्रभावीत क्षेत्रात राहण्यास असल्याची खात्री लायक माहिती पथकास मिळाल्याने दि. 08.05.2026 रोजी सदर माहिती पथकाने पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांना कळवून सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांनी दिलेल्या विशेष सुचना व मार्गदर्शना नुसार पथकाने कारवाई करुन सदर गुन्ह्यातील हशिश ऑईल विक्री करणारा आरोपी नामे प्रसेनजित ख्रिमहन दास वय 33 वर्षे, रा. ओडीसा राज्य यास जनतापाई ओडीसा या पहाडी भागातील दुर्गम नक्षलग्रस्त भागातुन यशस्वीरित्या ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. नळदुर्ग येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, रोहीत दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.