

दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथील नागरिकांसाठी यशवंत फेस्टिवल पलूस २०२६ चे आयोजन प्रदीपआप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती च्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ते सोमवार दिनांक 18 मे यादरम्यान हे फेस्टिवल होत आहे. यामध्ये शॉपिंग फेस्टिवल, फूड फेस्टिवल, फन फेअर यासोबत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, पलूस येथील गुंडा दाजी लॉन कराड तासगाव रोड पलूस येथे सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे फेस्टिवल नागरिकांसाठी खुले असणार आहे. इथे खरेदीची महापर्वणी आहे. विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायसेस, इमिटेशन ज्वेलरी, आकर्षक ड्रेस मटेरियल, मोबाईल आणि सोलर उपक्रमांच्या खरेदीचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. आणि यासोबत अस्सल महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या फेस्टिवलचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे सर्वांसाठी 18 हुन अधिक गेम, राइड्स आणि मनोरंजन उपलब्ध करण्यात आले आहे. आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन, नावडीसह फनफेअरचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. नागरिकांच्या मनोरंजनाकरिता एकापेक्षा एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. प्रदीप अप्पा कदम हे नेहमीच पलूस कडेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. सर्व सामान्य माणसांच्या हाकेला धावून जाणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे प्रदीपआप्पा अशी ख्याती निर्माण झाली आहे. पक्ष, जात, धर्म असा कोणताही भेद न करता आप्पा लोकांना सहकार्य करतात. जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी त्यांची प्रबोधन मोहीम सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याचे, प्रबोधनाचे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन पर कार्यशाळा, कृषी प्रदर्शन असे अनेक उपक्रम आप्पा नेहमीच राबवत असतात. प्रदीपआप्पा कदम यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यशवंत फेस्टिवल चे आयोजन केले आहे. पलूस शहर आणि परिसरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. शॉपिंग फेस्टिवल, फूड फेस्टिवल, फन फेअर यासोबत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 रोजी सर्किट नाना हा लाईव्ह शो होणार आहे. दिनांक 15 रोजी विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रवीण विनया विजय राणे निर्मित सर्व 45 भूमिका महिला कलाकारांनी साकारलेले ऐतिहासिक दोन अंकी नाटक शिवप्रताप सादर होणार आहे. दिनांक 16 रोजी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा लोक कलाविष्कार गर्जा महाराष्ट्र माझा.. गुणगान मराठी मातीचे वैभवशाली संस्कृतीचं हा अत्यंत देखणा कार्यक्रम आहे. दिनांक 17 रोजी गायिका श्वेता दांडेकर व सहगायक शुभम सातपुते यांचा लाईव्ह गायन व नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दिनांक 18 रोजी प्रेक्षणीय अशा भव्य रेकॉर्डिंग स्पर्धा होणार आहेत. यशवंत फेस्टिवलच्या माध्यमातून पलुस्कारांसाठी मनोरंजनाचा खजिनाच खुला होणार आहे.