दर्पण न्यूज भिलवडी:-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल विभागातील विद्यार्थिनी श्रीनिका रवींद्रकुमार पाटील हिने दहावी परीक्षेत ९९.२०% गुण मिळवून हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे साहेब ,संस्थेचे विश्वस्त मा.अशोक तात्या चौगुले ,संचालक संभाजी सूर्यवंशी, महावीर वठारे गुरुजी , चंद्रकांत भाऊ पाटील , शहाजी गुरव , सुभाष कवडे , संस्थेचे सचिव मानसिंग हाके उपस्थित होते.