कार्यालय : तहसीलदार, पलूस
ता. पलूस, जि. सांगली
प्रसिद्धी पत्रक
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा 1” अंतर्गत नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित सेवा सुलभ व जलद मिळाव्यात यासाठी विशेष महसूल समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने दि. 17 एप्रिल 2026 रोजी मौजे भिलवडी, ता. पलूस येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना खालीलप्रमाणे विविध सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे –
– 7/12 व 8A उतारा संदर्भात मार्गदर्शन
– जमीन नोंदीतील दुरुस्ती व प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही
– उत्पन्न, जात, रहिवासी इ. प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारणे
– डिजिटल 7/12 संदर्भात माहिती व मार्गदर्शन
– जमीन व्यवहार, अतिक्रमण व इतर महसूल विषयक तक्रारींचे निराकरण
– रेशन कार्ड संबंधित कामकाज
– पी एम किसान योजना
– फार्मर आय डी
– आधार नोंदणी व दुरुस्ती
– संजय गांधी, श्रावण बाळ योजना
– ई मोजणी
– कृषी विभागाच्या योजना
– MSEB संबंधित कामकाज
– ई पीक पाहणी
– आयुष्यमान कार्ड
– ग्राम विकास विभाग योजना
– शासनाच्या विविध योजनांची माहिती
तरी मौजे भिलवडी व परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी आपल्या महसूल विषयक समस्या व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.