दर्पण न्यूज मिरज -: नगरसेवक मोहन वाटवे यांना भीम आर्मीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त महापालिकेतर्फे जे शुल्क आकारले जाते ते रद्द व्हावे स्टेज व स्वागत कमान व मांडवला शुल्क आकारू नये म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख, जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख व साद गवंडी हे उपस्थित होते.
जैलाब शेख यांनी नगरसेवक मोहन वाटवे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जे महापालिका शुल्क आकारते स्वागत कमान,स्टेज व मांडवला ते शुल्क रद्द व्हावे ही मागणी केली
यावेळी निवेदन स्वीकारताना मिरज महापालिकेचे आक्रमक नगरसेवक जनतेच्या प्रश्नाचे जाण असलेले मोहन वाटवे म्हणाले की मी तातडीने भेट घेऊन महापौर साहेबव आयुक्तांना माझे स्वतःचे पत्र व भीम आर्मीचे पत्र प्रशासनाला देऊन महापालिका क्षेत्रामध्ये दिनांक 14/4/2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरी केले जाते या सर्व पार्श्वभूमीवर स्टेज,स्वागत कमान व मांडव असो यासाठी शुल्क आकारू नये निशुल्क करावे याबाबत मी प्रयत्न करणार असे यावेळी मोहन वाटवे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.