
दर्पण न्यूज पलूस :- पाणी फाउंडेशन, कृषी विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात चांगली शेती करण्याबाबत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कणेरी मठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील २९ महिला शेतकरी व १६ पुरुष शेतकरी कणेरी मठ कोल्हापूर येथे रवाना झाले.
यावर्षी पाणी फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये फार्मर कप स्पर्धा राबविण्यात येत असून सांगली जिल्ह्यातील दहा ही तालुक्याचा या स्पर्धेत सहभाग आहे ,त्याच अनुषंगाने पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात शेतीवरील खर्च कसा कमी करता येईल, अधिक उत्पादन कसे घेता येईल, उत्पादन वाढविण्याच्या पद्धती,रासायनिक खताचा अतिरेक वापरामुळे होणारे दुष्परिणाम, नैसर्गिक शेतीचे महत्व, सामूहिक शेतीचे फायदे, एकीची ताकद तसेच यावर्षी फार्मर कप स्पर्धा कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने शेती करण्याची दिशा मिळेल.
कोल्हापूर येथील प्रशिक्षणसाठी शेतकऱ्यांना मार्गस्त करते वेळी तालुका कृषी अधिकारी श्री.दीपक कांबळे ,मंडळ कृषी अधिकारी श्री.संजयकुमार खारगे , कृषि अधिकारी अरविंद यमगर, उप कृषी अधिकारी श्री.उदय दौंड , सहाय्यक कृषि अधिकारी धुळूबा सुळे, सहाय्यक तंत्र व्यवस्थापक श्रीम.धनश्री काटकर ,तंत्र सहाय्यक श्री.रोहित शेटे ,उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक संतोष सुतार ,नोडल अधिकारी रोहित पाटील व पाणी फाउंडेशन उप विभागीय समन्वयक श्री.अजय माने उपस्थित होते.