दर्पण न्यूज पुणे:- कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या केरळ लघुपट महोत्सवाचा सहावा केरळ लघुपट महोत्सव पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.यंदा हा महोत्सव 29 मार्च रोजी होणार आहे.
मराठी चित्रपट परिवार या संस्थेतर्फे पुण्यातील नवी पेठेतील प्रभुज्ञान मंदिर येथे 29 मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.भारतासह देश-विदेशातील सुमारे 50 हून अधिक लघुपट या महोत्सवांमध्ये दाखवण्यात येणार आहेत.या लघुपटान पैकी सुमारे 25 लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिक देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ लेखक चित्रपट समीक्षक आणि संगीत अभ्यासक सुभाषचंद्र जाधव यांच्या हस्ते महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
महोत्सव सर्व रसिकांसाठी मोफत खुला राहणार आहे.महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील सुमारे 100 हून अधिक चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांनी सहभाग नोंदविला होता या लघुपटान पैकी निवडक असे उत्तम 50 लघुपट या महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहे या 50 लघुपटान पैकी सर्वोत्तम सुमारे 25 लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके प्रदान करण्यात येतील.