दर्पण न्यूज मिरज / सांगली : पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल 400 किलो लिटर व डीझेल 450 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल 810 किलो लिटर व डीझेल 970 किलो लिटर, आयओसीएल कंपनीचा पेट्रोल 1420 किलो लिटर व डीझेल 1440 किलो लिटर इतका साठा उपलब्ध आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डीझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे, तरी सर्व ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.