आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान

साहित्यिक कवी सुभाष कवडे यांच्या “जांभळमाया” ललित लेखांच्या पुस्तकास पुण्याचा माहेर साहित्य रत्न पुरस्कार प्रदान 

 

 

दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी आणि वक्ते सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे कार्यवाहक सुभाष कवडे यांच्या जांभळमाया या ललित लेख संग्रहाच्या पुस्तकास नुकताच माहेर साहित्य रत्न पुरस्कार एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला .

पुणे येथील माहेर संस्था समाजातील अनाथ मुलं आणि महिलांसाठी कार्य करणारी भारतातील 75 शाखा असणारी एक सामाजिक संस्था आहे ही संस्था प्रतिवर्षी मराठीतील 20 साहित्यिकांच्या कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करते नुकताच माहेर संस्थेच्या हातखंबा येथील शाखेत एका विशेष समारंभात सुभाष कवडे यांच्या जांभळमाया या पुस्तकांसाठी माहेर साहित्यरत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील 20 पुस्तकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रथम सर्व साहित्यिकांची औक्षण करून ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीने व्यासपीठावर नेण्यात आले माहेर प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी स्वागत प्रास्ताविक करून सर्व साहित्यिकांचा व त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. रत्नागिरी येथील नामवंत पत्रकार संपादक प्राध्यापक यशवंत मसुरकर यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी सुभाष कवडे यांनी आपली कविता सादर करून माहेर संस्थेचा विशेष गौरव केला मसूरकर यांनी जांभळमाया पुस्तकातील लेखकाच्या संघर्षाचे लालीत्य स्वरूपातील वर्णन सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले यावेळी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आलेले होते वृषभ जाधव यांनी आभार मानले माहेर संस्थेचा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो सुभाष कवडे यांची आजवर 14 पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना शिक्षण साहित्य आणि समाजसेवा व वाचन चळवळ याबद्दल 50 हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत माहेर या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले बद्दल सुभाष कवडे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे या समारंभास रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नवनियुक्त लोकप्रतिनिधी समाजसेवक व साहित्यिक तसेच माहेर केंद्रातील अनाथ महिला वृद्ध मुले उपस्थित होते प्रारंभी माहेर संस्थेतील वृद्ध मुले विद्यार्थिनी यांनी प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!